भुसावळात भरधाव चारचाकीने दोन रीक्षांसह पादचार्‍याला उडवले


आरपीडी रस्त्यावर अपघात ; रेल्वे बॅरीगेटसच्या जाळीचेही नुकसान

भुसावळ- आरपीडी रस्त्यावरून महात्मा गांधी पुतळ्याकडे येणार्‍या भरधाव चारचाकीने दोन रीक्षांना उडवत पादचार्‍याला धडक दिल्याची घटना शनिवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास आरपीडी रस्त्यावरील प्रार्थनास्थळाजवळ घडली. अपघातानंतर मोठी गर्दी जमा झाली तर शहर पोलिसांनी चौकशीकामी चारचाकी चालक असलेल्या प्राध्यापकाला चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.

*आपल्या परीसरातील ताज्या घटना घडामोडींसाठी आमचे ब्रेकींग महाराष्ट्र हे यु ट्यूब चॅनल सबक्राईब करा*

*भुसावळातील अपघाताचा व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लीक करा-* https://youtu.be/48lHFsYUMlc

रीक्षांना धडक देणारा प्राध्यापक पोलिसांच्या ताब्यात
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार जळगावच्या नूतन मराठा विद्यालयातील प्रा.नरेंद्र सेवकराम धांडे (सांगवी, ता.यावल) हे आरपीडी रस्त्याकडून शहराकडे होंडा मोबिलो कार (एम.एच.19 बी.यु.8407) ने भरधाव वेगाने येत असताना त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्यांनी आनंद प्रभाकर तायडे यांच्या रीक्षा (क्रमांक एम.एच.19 सी.डब्ल्यू.2463) व अक्रम खान यांच्या रीक्षा (क्रमांक एम.एच.19 बी.यु.7033) ला जोरदार धडक दिली तसेच याचवेळी रस्त्यावरून जाणारे पादचारी मो.अबरार मो.हबीब (40, द्वारका नगर, भुसावळ) यांनाही जबर धडक दिली व धडकेनंतर वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या रेल्वेच्या संरक्षक कुंपणावर आदळल्याने खांबाही निखळला तर चारचाकीच्या चालक बाजूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघातानंतर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाल्यानंतर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, हवालदार मो.वली सैय्यद आदींनी घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवून चालक असलेल्या प्रा.धांडे यांना ताब्यात घेतले. शहर पोलिसात सायंकाळपर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. अपघातातील जखमी मो.अबरार मो.हबीब यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


कॉपी करू नका.