Eknathrav Khadse माजी मंत्री खडसेंसह स्वीय सहाय्यकांसह तत्कालीन भाजपा पदाधिकार्यांचा फोन टॅप : पडद्यामागील मुख्य सूत्रधार समोर येण्याची अपेक्षा
पडद्यामागील सूत्रधार समोर येण्याची जवाबातून खडसे यांनी व्यक्त केली अपेक्षा
Eknathrav Khadse भुसावळ : भारतीय जनता पार्टी हा पक्ष वाढवण्यासाठी उभी हयात खस्ता खालेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसे (Eknathrav Khadse) यांचा भाजपाच्या काळातच फोन टॅप झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता शिवाय माजी मंत्री खडसे (Eknathrav Khadse) यांचे निकटवर्तीय असलेले तथा तत्कालीन भाजपाचे अध्यक्ष अशोक लांडवंजारी यांच्यासह त्यावेळचे स्वीय सहाय्यक लक्ष्मण मुंडे यांचाही फोन टॅप झाल्याचा संशय खडसे यांनी कुलाबा पोलिसांना गुरुवारी दिलेल्या जबावातून व्यक्त केला आहे. दरम्यान, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी कोणत्या अधिकार्याच्या सांगण्यावरून हा प्रकार केला ? शिवाय टॅप केलेले रेकॉर्डींग कुणाला वा कोणत्या पक्षाला पुरवण्यात आले याची सखोल चौकशीची मागणी खडसे (Eknathrav Khadse) यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी कायदेशीर सल्ला घेवून पुढील कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.
राजकीय स्पर्धकाच्या सांगण्यावरून घडला प्रकार
बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात गुरुवारी खडसे यांनी कुलाबा पोलिसात जवाब नोंदवला होता. 40 वर्ष ज्या पक्षात काम केले व ज्या भाजपा पक्षाला निष्ठेने वर आणले त्या पक्षाचे सरकार असताना माझा फोन टॅप होण्याचा प्रकार म्हणजे हा घाणेरड्या राजकारणाचा अनुभव असून या प्रकाराची आता सखोल चौकशी गरजेची असून कुणाच्या सांगण्यावरून हा प्रकार घडला हेदेखील समोर येणे गरजेचे असल्याचे यावेळी खडसे (Eknathrav Khadse) यांनी म्हटले होते. राजकीय स्पर्धकाच्या सांगण्यावरून हा दुर्दैवी प्रकार घडल्याचा आपल्याला संशय असल्याचे यावेळी खडसे (Eknathrav Khadse) म्हणाले होते.





खडसे म्हणाले : यापूर्वीच आली होती शंका
रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) या कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्या नाहीत त्या आयपीएस अधिकारी आहेत त्यामुळे त्यांनी कुणाच्या सूचना व अधिकारावरून फोन टॅप केले हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. माझ्या खाजगी आयुष्यात ढवळा-ढवळ करण्यात आली असून समाजविघातक कृत्य करणार्यांच्या यादीत आपले नाव टाकण्यात आले. यापूर्वी सुद्धा माझा फोन टॅप होता, असा पत्रव्यवहार मी राज्याचे चीफ व होम सेक्रेटरी यांना 2019 पूर्वीच पत्र देवून कळवले होता व तो संशय आता खरा ठरला आहे. माझ्या व्यक्तीगत झालेल्या बदनामीनंतर कायदेशीर सल्ला घेवून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे खडसे (Eknathrav Khadse) म्हणाले.
राजकीय स्पर्धकाच्या सांगण्यावरूनच फोन टॅपींग
कुणीतरी माझा राजकीय स्पर्धक असावा व ज्याला मी राजकीय स्पर्धक वाटतो त्यांच्या सूचनेनुसार फोन टॅपींग (Phone Tap) प्रकरण घडल्याचा संशय असल्याचे कुणाचेही नाव न घेता माजी मंत्री खडसे यांनी व्यक्त केला. पोलिसांना याचा तपास करावा, अशी विनंती आपण केली आहे, असेही खडसे (Eknathrav Khadse) म्हणाले.
‘झारीतल्या शुक्राचार्यांची’ नावे समोर यावीत
हेवीवेट राजकीय नेते असलेल्या खडसे यांच्यापासून नेमका कुणाला धोका निर्माण झाला म्हणून हे टॅपींग करण्यात आले शिवाय कोणत्या उच्चपदस्थ अधिकार्यांच्या सांगण्यावरून आयपीएस शुक्ला यांनी फोन टॅपींग केले तसेच टॅपींग केलेले रेकॉर्डस कोणत्या राजकीय व्यक्तीस वा पक्षाला त्यांच्या फायद्यासाठी पुरवण्यात आली आदी बाबी तपासात समोर याव्यात, अशी अपेक्षाही खडसे (Eknathrav Khadse) यांनी कुलाबा पोलिस निरीक्षक संजय मोहिते (Kulabha Police PI Sanjay Mohite) यांच्याकडे नोंदवलेल्या जवाबातून व्यक्त केली आहे.
