पूरग्रस्तांना मदतीतही भाजपा सरकारची चमकोगिरी


सोशल मिडीयावर नेटकरी संतापले ; भाजपा सरकारवर चौफेर टिका

कोल्हापूर : पूरग्रस्त परीसराच्या पाहणीदरम्यान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सेल्फिमुळे टिकेची धनी ठरल्याची बातमी विस्मरणात जात नाही तोच ईचलकरंजी दखता समिती अध्यक्ष व भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह स्वतःचा फोटो असलेले स्टिकर मदत म्हणून दिल्या जाणार्‍या अन्न-धान्याच्या पाकिटावर लावले आहेत. पूरग्रस्तांना दिल्या जाणार्‍या मदतीमध्ये देखील भाजप सरकार चमकोगिरी करत जाहिरातबाजी करत असल्याने सोशल मीडियावर नेटकर्‍यांनी संताप व्यक्त केला आहे.

भाजपा सरकारवर चौफेर टिका
स्वाभिमान शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी हा प्रकार म्हणजे मयताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा असल्याची प्रतिक्रिया दिली असून सरकार प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करीत सरकारने स्टिकर छापण्यासाठी तब्बल दोन दिवस उशिर केला असून शो बाजीसाठी हे सरकार लोकांना उपाशी मारायला निघाल्याचे ते म्हणाले.

आमदार हाळणकरांची दिलगिरी
आमदार हाळणकर यांनी या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून रेशन दुकानदारांनी हे स्टीकर लावल्याचे सांगत ही मदत शासनाची असल्याची कबुली दिली आहे.


कॉपी करू नका.