जातप्रमाणपत्र नसल्याचा फटका : सेनेसह राष्ट्रवादी जिल्हा परीषद सदस्य अपात्र
राष्ट्रवादीचे आत्माराम कोळींसह सरला कोळींच्या वाढल्या अडचणी
जळगाव : मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने वाघोदा-विवरा जिल्हा परीषद गटातील राष्ट्रवादी काँगे्रेसचे सदस्य आत्माराम सुपडू कोळी (रा.विवर) तसेच हतनूर-तळवेल (ता.भुसावळ) गटातील शिवसेनेच्या सदस्या सरला सुनील कोळी यांना जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी सदस्य पदावरून अपात्र केल्याने जि.प.सदस्यांच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दोघे सदस्य अपात्रतेने खळबळ
पाल, ता.रावेर येथील गोमती सीताराम बारेला यांनी जिल्हाधिकार्यांकडे वाघोदा-विवरे जि.प. टातील सदस्य आत्माराम सुपडू कोळी यांनी निवडून आल्यापासून सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याची तक्रार केली होती तर सुसरीचे प्रकाश रामचंद्र मोरे यांनी हतनूर-तळवेल गटातील अनुसुचित जमाती स्त्री राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सरला कोळी यांनी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याची तक्रार केली होती.