20 वर्षीय तरुणीची आत्महत्या : धावत्या रेल्वेतील घटना
मुंबई : धावत्या रेल्वेत वीस वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. अद्यापर्यंत तरुणीची ओळख पटलेली नाही.
धावत्या रेल्वेतच आत्महत्या
धावत्या रेल्वेत एका 20 वर्षीय तरुणीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना रविवारी दुपारी एकच्या सुमारास समोर आली आहे. संबंधित तरुणी स्वराज एक्स्प्रेसमधील वॉशरूम कोचमध्ये गेली होती. पण बराच काळ उलटूनही ती परत आली नाही. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली असता मिळाली नाही. दरम्यान रेल्वेतील कर्मचार्यांनी संबंधित कोचचा दरवाजा उघडला असता, 20 वर्षीय तरुणी लटकलेल्या अवस्थेत आढळली.