अप्रिय घटना टाळण्यासांठी सराफ बांधवांनी लावावेत सीसीटीव्ही कॅमेरे


मुक्ताईनगर : शहरातील भुसावळ रोडवरील भरवस्तीत असलेल्या अंबिका ज्वेलर्समधून चोरट्यांनी सुमारे 70 हजारांचा ऐवज लांबवला होता. या चोरीच्या अनुषंगाने शहरातील सर्व सराफा व्यावसायीक व व्यापारी असोसिएशनची संयुक्त बैठक मंगळवार, 10 रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. निरीक्षक शेळके यांनी व्यापारी बंधूंना अप्रिय घटना टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत तसेच सुरक्षा रक्षक नेमावेव तसेच दुकानात असलेला किंमती ऐवज हा सुरक्षित लॉकरमध्ये ठेवणची सूचना केली.

फैजपूर प्रादेशिक वनक्षेत्राचे वनपाल यांचा उपचारादरम्यान मृत्यू

डीव्हीआर ठेवावा सुरक्षित
दुकानातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा डिव्हीआरची जागा न लक्षात येणार्‍या ठिकाणी ठेवावी तसेच कॅमेर्‍याचा अँगल असा ठेवावा जेणेकरून रोडावरून येणार्‍या-जाणार्‍या वाहनाचे नंबर, दुकानात येणार्‍या ग्राहकांचे चेहरे सीसीव्हीव्ही टीपले जातील अशा पद्धत्तीने ठेवण्याच्या सूचना निरीक्षक शेळके यांनी केल्या. बैठकीला 15 ते 20 सराफा व्यापारी उपस्थित होते. पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, गोपनीय विभागाचे हवालदार गणेश मनुरे उपस्थित होते.

अट्रावलच्या वयोवृद्धेचा पाटचारीत पडल्याने मृत्यू 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !