भुसावळ शहरात उद्या भीमगीतांचा कार्यक्रम : उर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांची प्रमुख उपस्थिती
भुसावळ : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर (डी.एस.ग्राऊंड) शुक्रवार, 13 रोजी सायंकाळी सहा वाजता सिने गायक आनंद शिंदे यांचा भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांची प्रमुख उपस्थिती असेल शिवाय अन्य मान्यवरही कार्यक्रमास हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजक डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष प्रवीण सुरवाडे यांनी केले आहे.


