केळीने भरलेला ट्रक उलटल्याने मजुराचा मृत्यू
पिंप्रीजवळील घटना ; मयत मध्यप्रदेशातील रहिवासी
रावेर- केळीने भरलेला ट्रक उलटल्याने त्या खाली दबला जावून मध्यप्रदेशातील मजुराचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील पिंप्री गावाच्या बसस्थानकाजवळ शनिवारी सायंकाळी घडली. या अपघातात अरुण विठ्ठल बारी यांचा मृत्यू झाला. पिंप्री येथून केळीने भरलेला ट्रक मजुरांसह रावेरच्या दिशेने येत असताना ट्रक बसस्थानकाजवळ उलटल्याने ट्रकमधील मजुर अरुण विठ्ठल बारी यांचा जागीच मृत्यू झाला. बारी हे मध्यप्रदेशातील बंभाळा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ते पोटाची खळगी भरण्यासाठी केळी कापणीचे काम करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.