विनापरवानगी वाजवजा डीजे : रावेरात गुन्हे दाखल
Rawer DJ Karwai रावेर : लग्न समारंभात विना परवाना डीजे वाजविल्याप्रकरणी रावेर पोलिसात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आल्याने डीजे चालकांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
आमदगावात पाच लाखांची धाडसी चोरी
विना परवानगी डीजे वाजवल्यास दाखल होणार गुन्हे
रावेरातील राजे संभाजीनगर भागात सोमवार, 9 मे रोजी खाजगी समारंभात असताना विना परवाना जास्त वेळ डिजे वाजविल्याबद्दल डिजे मालक सचिन अर्जुन भोई व डी.जे चालक भुषण केशव भोई, डी.जे.वाहन चालक राहुल शिवलाल भोई (सर्व रा.भोईवाडा, रावेर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसर्या घटनेत रावेर तालुक्यातील रसलपूर येथे बुधवार, 11 मे रोजी खाजगी समारंभात डी.जे.मालक सोनू मदन हर्दे (रा.रावेर), डी.जे चालक कन्हैया संतोष महाजन (रसलपूर) यांनी विनापरवाना वेळेपेक्षा जास्त आणि विनापरवाना डीजे वाजविल्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहादा तहसीलच्या लाचखोर लिपिकासह पंटर नंदुरबार एसीबीच्या जाळ्यात
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक, सहाय्यक फौजदार राजेंद्र करोडपती, हवालदार बिजू जावरे, पोलिस नाईक पुरुषोत्तम पाटील यांच्या पथकाने करीत डीजे वाहन ताब्यात घेतले आहे. याबाबत रावेर पोलिस स्टेशनमध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. सहाय्यक फौजदार ईस्माईल शेख, पोलिस नाईक जगदीश पाटील तपास करीत आहेत.