शेतातील विहिरीत पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू
जळगाव : शेतातील विहिरीत पडल्याने तालुक्यातील वराडच्या तरुणाचा मृत्यू झाला झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. राहुल भरत जाधव (28, रा.वराड, ता.जि.जळगाव) असे मयताचे नाव आहे.
मुक्ताईनगराजवळील अपघातात धुळ्यातील चौघांचा तर जळगावातील एकाचा मृत्यू
विहिरीत पडल्योन मृत्यू
जळगाव तालुक्यातील वराड गावातील राहुल हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. तो मानसिक रुग्ण असल्याने तो अनेक दिवस घरी देखील जात नव्हता. शुक्रवार, 13 मे रोजी सकाळी मजूर शेतात काम करीत असतांना ते पाणी पिण्यासाठी हिलाल पुंडलिक नेरे यांच्या शेतातील विहिरीवर गेले असता त्यांना विहिरीत मृतदेह तरंगतांना आढळला. त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ शेत मालकाला दिली. शेतमालकासह सरपंच संदीप सुरळकर, राजेंद्र जाधव, भाऊलाल जाधव, पोलिस कर्मचारी राजेंद्र उगले यांच्यासह ग्रामस्थांनी शेतात धाव घेत पोलिसांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. यावेळी तो मृतदेह राहूल जाधवचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणला मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास सचिन मुंढे हे करीत आहे.