गुजरात एटीएसकडून चार आरोपींना अटक
मुंबई : १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील चार आरोपींना गुजरात एटीएस दहशतवाद विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी गेल्या २९ वर्षांपासून फरार असलेल्या चारही आरोपींना शिताफीने अटक केली आहे.
कारवाईने उडाली खळबळ
१९९३ मध्ये संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या साखळी बॉम्बस्फोट घटना मुंबईत घडली होती. आतापर्यंत अनेक आरोपींना अटक पोलिसांनी केली असून या साखळी बॉम्बस्फोटातील अनेक आरोपी फरार, तर काहीनी विदेशात आश्रय घेतला होता. या बॉम्बस्फोट प्रकरणी अबू बकर, युसूफ भटका, शोएब कुरेशी उर्फ शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी हे चारही जण काही दिवसांपूर्वी बनावट पासपोर्टच्या आधारे अहमदाबाद येथे आल्याची माहिती गुजरात एटीएसला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी करत चारही आरोपींना अटक केली आहे. अबू बकर हा मुंबईतील अब्दुल रेहमान स्ट्रीट परिसरात आपल्या कुटुंबासमवेत राहत असून त्याला राहत्या घरातून ताब्यात घेतले असून गुजरात एटीएस पथकाने मोठी कारवाई करीत अबू बकर, युसूफ भटका, शोएब कुरेशी उर्फ शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी या चारही जणांना अटक केली आहे.







