घरा जवळून सुरक्षा रक्षकाची लांबवली मोटरसायकल


भुसावळ : शहरातील श्रीराम नगर मधील मृत्युंजय मंडळ जवळील रहिवासी तथा सुरक्षा गार्ड मिलिंद प्रभाकर पाटील यांची मोटर सायकल कोणीतरी चोरट्याने दि. १५ मेच्या रात्री लांबवली. ही घटना सोमवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. पाटील यांनी त्यांची सुमारे वीस हजार रुपये किमतीची एच एफ डिलक्स कंपनीची काळ्या रंगाचे मोटर सायकल (एम एच १९ सीएन ९७७४) घराजवळ लावलेली असता कोणीतरी चोरट्याने ती चोरून नेली. याबाबत पाटील यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस महेश चौधरी पुढील तपास करीत आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !