नदीत बुडून कोथळीतील वयोवृध्दाचा मृत्यू


मुक्ताईनगर : तालुक्यातील कोथळी येथील नदीत ७३ वर्षीय वयोवृध्दाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू
महादेव जयराम बोदडे (७३, रा. जाफरापूर, ता.तिव्हारा, जि.कोला) हे कामादरम्यान मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे आले होते. दरम्यान बुधवारी १८ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांच्या कोथळी नदीत बुडून मृत्यू झाला. सुरूवातीला अनोळखी म्हणून मयत होते. त्यांच्या खिश्यात आधारकार्ड आढळून आले. महादेव बोदडे असे नाव असल्याचे समोर आले आहे. मुक्ताईनगर येथील पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी जाधव व पवार यांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. मुक्ताईनगर ग्रामीण रूग्णालयात मृतदेह आणण्यात आला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मा‍त मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !