चोरट्यांनी दुचाकी लांबविली
जळगाव : शहरातील गोलाणी मार्केट परीसरात हॉस्पिटलच्या कामासाठी आलेल्या तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
नारायण राजाराम पाटील (44 रा.रवंज, ता.जि.जळगाव) हे 14 मे रोजी सकाळी 11 वाजता शहरातील गोलाणी मार्केटजवळील रूद्राक्ष मोबाईल रिपेअरींग दुकानासमोर दुचाकी (एम.एच.19 ए.वाय.2604) ने आले त्यांनी दुचाकी पार्क करून ते डॉ.नरेंद्र जैन यांच्या दवाखान्यात कामानिमित्त गेले. त्यानंतर दुपारी एक वाजेच्या सुमारास दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकी जागेवर दिसून आली नाही. त्यांनी दुचाकीचा परीसरात शोधाशोध केली परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर गुरूवार, 19 मे रोजी दुपारी शहर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.







