फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा दंडुका : साडेबारा कोटींची वसुली


भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाकडून विना तिकिटे प्रवास करणारे / अनियमित तिकीट यात्रा / गैरवापर हे रोखण्यासाठी अनियमित यात्रा करणार्‍यांसाठी विशेष तिकीट तपासणी मोहीमही 01 एप्रिलपासून सुरु करण्यात आली आहे. यात 12 कोटी 46 लाख 83 हजार 434 रुपयांची वसुली करण्यात आली.

यु ट्यूबवर व्हिडिओ पाहून घरातच केली बनावट नोटांची छपाई : हिंगणेचा आरोपी पहूर पोलिसांच्या जाळ्यात 

फुकट्या प्रवाशांच्या गोटात खळबळ
भुसावळचे वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ.शिवराज मानसपूरे यांच्या मार्गदर्शनानुसार व विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी.अरुणकुमार आणि सहायक वाणिज्य प्रबंधक (टी.जा.) अनिल पाठक, विशेष तिकीट तपासणी निरीक्षक वाय.डी.पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली 01 ते 15 मेदरम्यान या कालावधीत तिकीट तपासणीत एक लाख 50 हजार 251 केसेसद्वारे 12 कोटी 46 लाख 83 हजार 434 रुपयांची वसूली करण्यात आली. गत वर्षी 1 एप्रिल ते 15 मे 021 या कालावधीत 77 हजार 923 केसेसद्वारे रुपये सहा कोटी 30 लाख 76 हजार 988 रक्कम वसूल केली करण्यात आली. मागील वर्षाच्या तुलनेने या 45 दिवसात जवळपास दुप्पट रक्कम वसुल करण्यात आली. प्रवाशांनी योग्य तिकिटासह प्रवास करुन आपला सुखद प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

केतकी चितळेच्या अडचणीत वाढ : आता अ‍ॅट्रासिटीच्या गुन्ह्यात पोलिसांनी केली अटक 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !