काकोडा विकासो निवडणुकीत आदर्श पॅनलने मारली बाजी
संपूर्ण 13 जागांवर भाजपा पुरस्कृत सदस्यांची निवड : दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
कुर्हाकाकोडा : काकोडा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत शेतकरी परीवर्तन पॅनलविरुद्ध भाजपा पुरस्कृत आदर्श सहकार पॅनलमध्ये चुरशीची निवडणूक झाली. त्यात भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर यांनी आपला गड राखला. भाजपा पुरस्कृत आदर्श सहकार पॅनलने संपूर्ण 13 जागांवर विजय मिळवला. निवडणुकीत 323 पैकी 299 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचा धुव्वा उडाला.
या सदस्यांनी मिळवला विजय
विकासो निवडणुकीत सुनील मिठाराम पाटील, विलास धोंडू जळमकार, चंद्रकांत नामदेव कोल्हे, वासुदेव विक्रम पाटील, तुकडू हिरामण चव्हाण, लक्ष्मण दलपत पवार, ममतार प्रेमसिंग पवार, लाला मारोती ठेलारी, प्रशांत प्रल्हाद बढे, शिवराम द्वारका मदने, प्रभाकर किसन कोळी, रंजना रवींद्र ढोले, सत्याबाई मानसिंग चव्हाण हे भाजपा पुरस्कृत आदर्श सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाले. विजेत्या उमेदवारांचा आदर्श सहकार पॅनल प्रमुख व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र सावळे, रमेश ढोले, शांताराम चोपडे, मधुकर भोलाणकर, कुळकर्णी, विजय पाटील, रसाल पवार, वनील चव्हाण, उपसरपंच भरत मदने, संजय सपकाळ, सुधाकर पाटील, सुरेश कोळी, मारोती पाटील, सिद्धार्थ सोनवणे,नारायण गोळे, दीपक भगत, रामदास कुंवर, एकनाथ मिस्तरी, अशोक ईश्वरे, नारायण गोळे आदींनी सत्कार केला.








