पिंपरूळच्या विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू
फैजपूर- पिंपरूळ येथील एका 28 वर्षीय विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. मंदाबाई छगन तायडे असे मयत महिलेचे नाव आहे. मंदाबाई या सकाळी आपल्या घरासमोर भांडी धूत असताना त्यांना सर्पदंश झाला. या घटनेची माहिती मिळताच घरातील सदस्यांनी व आजूबाजूच्या लोकांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी फैजपूर पोलिसात पोलिस पाटील हरीष चौधरी यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे, फौजदार जिजाबराव पाटील, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ तपास करीत आहेत. मंदाबाई तायडे यांच्या पश्चात पती, तीन मुले असा परीवार आहे.