व्दितीय सत्र परीक्षा 2020 च्या प्रश्नपत्रिकेच्या आधारावर
शिक्षण तज्ज्ञ प्र.ह.दलाल यांचा आरोप : शासन परीपत्रक गुंडाळले
भुसावळ : शासन आदेशानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांची व्दितीय सत्र परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात आल्या मात्र या परीक्षांसाठी अनेक माध्यमिक शाळेत 2020 च्या प्रश्नपत्रिकांचा सर्रास वापर करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
मग नवं तंत्रज्ञान, नव्या कल्पना येणार तरी कश्या?
राज्यात 2010 पासून लागू असलेल्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण, सर्वंकष मूल्यमापन करणारे परीपत्रक शासनाने 20 ऑगस्ट 2010 रोजी काढले आहे. त्यातील मुद्दा क्र.2:6 नुसार प्रत्येक शाळेतील त्या त्या वर्गाना शिकविणार्या शिक्षकांनी विषयनिहाय, वर्ग निहाय संकलित मूल्यमापन प्रत्येक सत्राच्या अखेरीस करावयाचे आहे व त्यासाठी अन्य कोणाही बाह्य यंत्रणेकडून तयार केलेली मूल्यमापन साधने, तंत्र, प्रश्नपत्रिका वापरल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे स्पष्ट आदेश निर्गमित केले आहे. मात्र हे सर्व बाजूला ठेऊन शिक्षकांनी स्वतः प्रश्नपत्रिका न काढता आपल्याला सोईस्कर व परंपरागत पद्धतीचं मुख्याध्यापकांनी वापरलेली दिसत आहे. त्यामुळे शिक्षणं क्षेत्रात नवं तंत्रज्ञान, नव्या कल्पना येणार तरी कश्या? मुख्याध्यापकांनी स्वतः अभ्यास करून नवीन बदल अंगीकारले पाहिजे व आपल्या शाळेत त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. तसेच र्ज्ञेींळव मुळे अभ्यासक्रम पूर्ण झालेला नसल्याने शासनाने वर्ष भरा पूर्वीच प्रत्येक विषयाचा काही भाग अभ्यासक्रमातून वगळलेल्या आहे मात्र या प्रश्नपत्रिकाच मुळात 2020च्या असल्याने आता वगळलेल्या अभ्यासक्रमावर ही प्रश्न विचारण्यात आले आहेत. हा शासन आदेशाचा भंग तर आहेच शिवाय विद्यार्थ्यांचा मानसिक छळ ही आहे. ह्या गंभीर प्रकरणाची जिल्हा मध्यामिक शिक्षणाधिकर्यांनी सखोल चौकशी करून शासन आदेश धुडकावून परीक्षा घेणार्या मुख्याध्यापकांवर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षणतज्ज्ञ प्र. ह. दलाल यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

भालोदच्या बेपत्ता इसमाचा विहिरीत आढळला मृतदेह







