फैजपूरातील हद्दवाढ झालेल्या भागात सोयी-सुविधांसाठी डीपीआर तयार


फैजपूर  : शहराची हद्दवाढ झालेल्या भागात रस्ते, गटारी तसेच अत्यावश्यक नागरी सुविधा व विकास कामे करण्यासाठी शासनाकडे पालिकेमार्फत (डी.पी. आर) विस्तृत प्रकल्प तयार करून शासनाकडून निधी मिळावा यासह तीन महत्वपुर्ण विषयांवर शुक्रवारी चर्चा करून फैजपूर पालिकेच्या सभेत मंजुरी देण्यात आली.

पालिकेची विशेष सभा
फैजपूर पालिकेच्या विशेष साधारण सभेचे आयोजन शुक्रवारी सकाळी 11 वाजता पालिका सभागृहात प्रभारी नगराध्यक्ष रशीद तडवी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. विषय पत्रिकेवर चर्चेसाठी चार विषय होते. यावेळी मुख्याधिकारी किशोर चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. तत्पूर्वी सभेत बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून सभेला सुरुवात करण्यात आली. 2019-20 ते 2023-24 या पंचवार्षिक रीव्हिजन माहे डिसेंबर 2019 पावतो मुदतवाढीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यास मंजुरी देणेबाबत विचार करणे, फैजपूर शहरातील मालमत्ता सन 2019-20 ते 2023-24 पंचवार्षिक पुर्नमूल्यांकनासाठी व वार्षिक आकारणीकामी गुणांक (दर) ठरविण्याबाबत विचार विनिमय करणे आदी दोन्ही विषयांबाबत भाजपा गटनेते मिलिंद वाघूळदे यांनी सध्या दुष्काळग्रस्त परीस्थिती असल्याने पंचवार्षिक रिव्हीजन व पंचवार्षिक पुर्नमल्यांकनासाठी व वार्षिक आकारणी गुणाक दर वाढ यांना शासनाने मुदतवाढ करून द्यावी, असा ठराव करून शासनाकडे पाठवण्यात येईल असे सूचविले. त्यास सर्व नगरसेवक यांनी सहमती दिली. फैजपूर शहराची हद्दवाढ झालेल्या भागात रस्ते, गटारी, पाण्याची पाईप लाईन करणे, लाईट आदी विकास कामे घेण्यासाठी डी.पी.आर तयार करून शासनाने या भागासाठी निधी देण्यात यावा, अशा तीन विषयांवर विचारविनिमय करून मंजुरी देण्यात आली.






यांची सभेला उपस्थिती
यावेळी सभेला भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे, नगरसेवक हेमराज चौधरी, काँग्रेस गटनेते कलीम खां मण्यार, राष्ट्रवादी गटनेते शेख कुर्बान यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. यावेळी सभेचे कामकाज सहाय्यक कार्यालय निरीक्षक संतोष वाणी, कर निरीक्षक बाजीराव नवले, सभा लिपिक सुधीर चौधरी, मनोहर चौधरी यांनी काम पाहिले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !