!-- afp header code starts here -->

15 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवले : अज्ञाताविरोधात गुन्हा


जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा
शहरातील रामेश्वर कॉलनी परीसरात 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवार, 22 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेले. मुलगी बेपत्ता झाल्यावर तिच्या कुटुंबियांनी नातेवाईक व मैत्रिणीकडे तपास केला तर कुठेही आढळून आली नाही. पीडीत मुलीच्या वडीलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.

चारचाकी वाहनाच्या धडकेत शिरसोलीतील दुचाकीस्वार जागीच ठार 


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !