!-- afp header code starts here -->

लाचखोर ग्रामसेवकासह सरपंचपतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी


पाचोरा : रोजगार सेवकाला मानधनापोटी देण्यात येणार्‍या धनादेशावर स्वाक्षरी करण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारताना वरसाडे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक काशीनाथ राजधर सोनवणे (52, रा.प्लॉट नं.3, शिवनेरी नगर, भडगाव रोड, चाळीसगाव) व महिला सरपंच पती शिवदास भुरा राठोड (67, रा.पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा) यांना मंगळवारी दुपारी अडीच वाजता जळगाव एसीबीने कार्यालयातच अटक केली होती. संशयीतांना बुधवारी जळगाव न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने संशयीतांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

वरणगावातून ट्रॅक्टर लांबवले : जळगावातील आरोपी एलसीबीच्या जाळ्यात

दोन्ही संशयीतांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
41 वर्षीय तक्रारदाराने ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा. अंतर्गत होणार्‍या रोजगार हमी योजने अंतर्गत कामांसाठी मानधन तत्वावर रोजगार सेवक म्हणून काम केले असून या कामापोटी त्यांना मानधन मिळणार होते मात्र त्यासाठी मिळणार्‍या धनादेशावर सही देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे ग्रामसेवक काशीनाथ सोनवणे यांनी महिला सरपंच पती शिवदास राठोड यांच्यासाठी सहा हजारांची लाच मागितली मात्र चार हजारावर तडजोड झाल्यानंतर एसीबीकडे मंगळवार, 24 रोजी तक्रार नोंदवण्यात आली व मंगळवारी दुपारी ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा.कार्यालयात एसीबीकने सापळा यशस्वी केला होता. संशयीतांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना बुधवारी जळगाव न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. जळगाव एसीबीतर्फे निरीक्षक संजोग बच्छाव यांनी बाजू मांडली.

सिंगत शिवारात पिंप्रीसेकमच्या 40 वर्षीय इसमाचा निर्घृण खून


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !