!-- afp header code starts here -->

पाचोरा शहरात बियाणे विक्रेत्यांच्या तपासणीने खळबळ


पाचोरा : शहरातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांची तालुकास्तरीय भरारी पथकाकडून तपासणी करण्यात आल्याने विक्रेत्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

साठा रजिस्टरसह दरपत्रकांची तपासणी
शहरातील पारस कृषी सेवा केंद्र, न्यु जैन अ‍ॅग्रो एजन्सी, परेश कृषी केंद्र, धनश्री अ‍ॅग्रो एजन्सी, श्री गणेश कृषी केंद्र या विक्री केंद्रांची तपासणी करून प्राथमिक आढळून आलेल्या त्रृटींबाबत संबंधितांना लेखी सूचना देवून शेतकर्‍यांना सर्व निविष्ठा (बियाणे, खते, कीडनाशके) शासनाने ठरवून दिलेल्या दराने विक्री करणे, साठा रजिस्टर व ऑनलाईन परवाना अपडेट करुन त्यात विक्री करावयाचे सर्व ग्राहकांचे ओ फार्म/ग्रामप्रमाण पत्रे ऑनलाईन पद्धतीने अपडेट करणे, दरपत्रक बोर्ड, बिले खरेदीदारांना देवुन त्यावर सही घेणे यासारख्या सुचना करण्यात आल्या.

तालुक्यातील सर्वच केंद्राची होणार तपासणी
तालुक्यातील सर्व केंद्रांची तपासणी केली जाणार आहे. शिवाय कृषी विभाग (महाराष्ट्र शासन) यांचे आदेशानुसार कापुस बियाणे विक्री दि. 1 जुन नंतरच करावी. कोणत्याही प्रकारचे अनाधिकृत व मान्यता नसलेले बियाणे विक्री होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. तपासणी वेळी तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, पंचायत समिती कृषी अधिकारी तथा भरारी पथक सदस्य सचिव एम.एस.भालेराव, मंडळ कृषी अधिकारी ए.व्ही.जाधव, कृषी सहाय्यक आर. बी.चौधरी उपस्थित होते

बंद घर पर्वणी : उमवि विद्यापीठ कर्मचार्‍याच्या घरातून चार लाखांचा ऐवज चोरीला 


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !