!-- afp header code starts here -->

डिकसाई शिवारात वाळूची चोरटी वाहतूक करताना ट्रॅक्टर जप्त


जळगाव : तालुक्यातील डिकसाई शिवारातील तापी नदी पात्रातून वाळूची चोरटी वाहतूक करताना ट्रॅक्टर जळगाव तालुका पोलिसांनी ताब्यात घेत एकाविरोधात गुन्हा दाखल केला.

वाळूची चोरटी वाहतूक ऐरणीवर
जळगाव तालुक्यातील डिकसाई शिवारात असलेल्या तापी नदीपात्रातून काहीजण वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण पाटील यांना मिळाली. त्यानुसार कारवाईच्या सुचना दिल्यात. यावेळी पोलीस कर्मचार्‍यांनी बुधवार, 25 मे रोजी दुपारी 12 वाजता डिकसाई शिवारातील तापी नदीपात्रात गेले असता वाळूने भरलेले ट्रॅक्टर क्रमांक (एम.एच. 19 बी.जी. 3986) आढळून आले. ट्रॅक्टर चालक मुकूंदा सुक्राम साळुंखे (रा. कोळन्हावी, ता.यावल) याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस नाईक दीपक कोळी यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलि नाईक विजय दुसानणे करीत आहे.

नवरा व दिरात कमालीचे साम्य : संधी साधत वहिनीवर वारंवार केला अत्याचार 


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !