ही माझी माघार नसून आपला स्वाभिमान : संभाजी राजे भोसले
कोल्हापूर : शिवसेनेबद्दल आपल्या मनात कुठलाही द्वेष नाही मात्र आपल्याला कुठल्याही बंधनात अडकायचे नाही व राज्यसभा निवडणुकीतून आपली माघार नसून हा तर आपला स्वाभिमान असल्याचे स्पष्ट मत संभाजी राजे भोसले यांनी व्यक्त केले आहे. घोडेबाजार होवू नये म्हणून निवडणूक न लढण्याचा निर्णय आपण घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
घोडेबाजार होऊ नये म्हणून मी निवडूक लढवणार नाही
शिवसेनेनं ऑफर दिल्यानंतर ती स्वीकारताच मी खासदार झालो असतो मात्र मला माहिती आहे त्याठिकाणी घोडेबाजार होणार आहे मात्र घोडेबाजार होऊ नये म्हणून मी निवडुकीला समोर जाणार नाही, ही माझी माघार नसून हा माझा स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे म्हणाले. मी छत्रपतींचा मावळा असून मावळा संघटीत करणे हा एकमेव पर्याय असल्याचेही ते म्हणाले. माझी ताकद जनता असून माझ्या आवडत्या कार्यकर्त्याला शिवसेनेने उमेदवारी दिली असल्याचेही ते म्हणाले.

भुसावळ-बोईसर बस वाघोबा खिंडीतील दरीत उलटली : 20 प्रवासी जखमी







