!-- afp header code starts here -->

Four members of the same family were killed in a tragic accident भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघै ठार


Four members of the same family were killed in a tragic accident निपाणी : महामार्गावर अपघातांची मालिका कायम आहे. लग्नासाठी निघालेल्या वर्‍हाडींच्या कारला भरधाव कंटेनरला उडवल्याने नवरीच्या भावासह, चुलते चुलती व आजीचा मृत्यू झाला आहे. छाया आदगोंडा पाटील (वय 55), आदगोंडा बाबू पाटील (55) महेश देवगोंडा पाटील (23) चंपाताई मगदूम (80, सर्व रा. बोरगाववाडी ता. निपाणी) अशी मृतांची नावे आहेत पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात उतारावरील हॉटेल अमरसमोर धोकादायक वळणावर भरधाव शुक्रवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.

कॉर्डेलिया क्रुझ प्रकरणात आर्यन खानला क्लीनचीट

लग्नाला जाताना भीषण अपघात
स्तवनिधी येथे मंगल कार्यालयात लग्नकार्यासाठी सर्वजण जात होते. या वेळी हॉटेल अमर नजीक अपघात घडला. या अपघाताची भीषणता इतकी होती की वाहनांचा चक्काचूर झाला आहे. कंटेनरच्या धडकेत कारमध्ये मृतदेह अडकून पडले होते. दरम्यान घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निबरगी, डीएसपी बसवराज यलीगीर, सीपीआय संगमेश शिवयोगी उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहेसूर यांच्यासह अग्निशमन विभागाने भेट देऊन मदत कार्य सुरू केले आहे.

ही माझी माघार नसून आपला स्वाभिमान : संभाजी राजे भोसले 


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !