डोंगरकठोरा गावात अज्ञाताकडून मोबाईल टॉवरची केबल वायर कापून नुकसान
यावल : तालुक्यातील डोंगरकठोरा गावात अज्ञात व्यक्तीने मोबाईल टॉवरची केबल वायर कापून नुकसान केले. या प्रकरणी यावल पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. एअरटेल सुरक्षा अधीकारी रवींद्र अरविंद पाटील यांनी यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार डोंगरकठोरा गावात एअरटेल मोबाईल कंपनीचे टॉवर असून टॉवरची सुमार हजार रुपये किंमतीची वायर कापून कंपनीचे नुकसान करण्यात आले. केबल वायर कापल्यामुळे काही काळ या टॉवरवर अवलंबून असलेली मोबाईल सेवा विस्कळीत झाली.
फुकटचा पैसा खाता, लाज वाटायला हवी : भुसावळात राज्य मंत्री बच्चू कडू मुख्याधिकार्यांवर संतापले







