हमसफर एक्स्प्रेसच्या धडकेने प्रौढाचा मृत्यू


पाचोरा : कजगाव, ता.भडगाव येथील प्रौढाचा हमसफर एक्स्प्रेसच्या धडकेने मृत्यू झाला. 27 मे रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अनिल पांडुरंग सोनवणे (45) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

रेल्वे धक्क्याने मृत्यूने
27 मे रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास अनिल पसोनवणे हे लघूशंकेसाठी गेले असतांना हमसफर एक्स्प्रेसचा धक्का लागला व ते जागीच मृत्यू झाला. सोनवणे हे अविवाहित असून त्यांचे रेल्वे रूळानजीक घर आहे. रात्री झोपेतून उठून लघुशंकेसाठी गेल्यानंतर त्यांना रेल्वेची धडक लागली. घटनेप्रकरणी पाचोरा येथील रेल्वे दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ईश्वर बोरुडे तपास करीत आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमित साळुंखे यांनी केले. अनिल सोनवणे यांच्या पश्चात आई, भाऊ, दोन बहिणी असा परीवार आहे.



 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !