Police Recruitment in Maharashtra गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले : सात हजार पदांसाठी या तारखेपासून भरती होणार सुरू


Police Recruitment in Maharashtra: मुंबई : राज्यातील बेरोजगार तरुणांचे पोलिस भरतीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिस भरतीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात सात हजार पदांसाठी 15 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे. राज्यात पोलिसांची पन्नास हजार पदे रिक्त आहेत. सध्या साडे पाच हजार मुलांची भरती पूर्ण होत आली आहे. सात हजार पदांची भरती काढली जाणार आहे. जूनच्या 15 तारखेपासून ही प्रक्रिया सुरू होणार असून राज्य मंत्री मंडळासमोर आणखी 15 हजार पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे, असे वळसे पाटील म्हणाले. ही मोठी भरती करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळ नक्कीच परवानगी देईल. पोलिसांवर खूप ताण आहे, तो कमी करण्यासाठी ही भरती गरजेची असल्याचे वळसे पाटील म्हणाले.

हमसफर एक्स्प्रेसच्या धडकेने प्रौढाचा मृत्यू

15 जूनपासून पोलिस भरतीला होणार सुरुवात
अधिकृत तारखेची माहिती जाहीर केली जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात पोलीस बदल्यांचा विषय चर्चेत आहे. हजारो तरुण पोलीस भरतीच्या दृष्टीने तयारी करीत आहेत. त्यातच आता गृहविभागाने आतापर्यंत साडे पाच हजार जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे तर सात हजार भरतीची प्रक्रियेला 15 जूनपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे.



पत्नी विरहात पतीचीही आत्महत्या : पाचोर्‍यातील घटना





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !