!-- afp header code starts here -->

अवैधरीत्या दारू विक्री : वैजापूरात पोलिसांची कारवाई


चोपडा : तालुक्यातील वैजापूर येथे अवैधरीत्या दारू विक्री करणार्‍या विक्रेत्यावर छापा मारत पोलिसांनी कारवाई करीत सुमारे सात हजारांचा मद्यसाठा जप्त केला.

अवैध मद्यविक्री प्रकरणी गुन्हा
वैजापूर येथील लीलाधर पंडित कोळी (38) हे गावातील अंगणवाडी मागे कैलास महाराजांच्या घरात अवैद्य दारू विक्री करताना पोलिसांना रंगेहाथ सापडले. त्यांच्याकडून सहा हजार 875 रुपयांचे तीन बिअरचे खोके, पाच हजार 580 रुपयांच्या बॉबी देशी दारूचे दोन खोके, 31 हजार 680 रुपयांचे टँगो पंच देशी दारूचे 11 खोके व 34 हजार 560 रुपये किंमतीच्या देशी दारूचे 12 खोके मिळून एकूण 78 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय अमरसिंग वसावे, कॉन्स्टेबल शिवाजी बाविस्कर, संजय इधे, लक्ष्मण सिंगाणे, कुणाल मराठे, प्रमोद पारधी व पोलीस महानिरीक्षकांच्या पथकातील एपीआय सचिन जाधव, बशीर तडवी, रामचंद्र बोरसे, शकील शेख, मनोज दुसाने, प्रमोद मंडलिक यांनी केली आहे. या प्रकरणी बशीर तडवी यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात लिलाधर कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

लष्करी वाहन 60 फूट खोल नदीत कोसळले : 7 जवान ठार


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !