भुसावळात 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

शवविच्छेदनानंतर कारण होणार स्पष्ट : घातपाताच्या चर्चेला ऊत


भुसावळ : शहरातील टिंबर मार्केटच्या जवळील आराधना कॉलनीजवळ रेल्वे रुळाजवळ 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला असून या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने विविध चर्चांना जोर आला आहे. पोलिसांनी प्राथमिकदृष्ट्या हा खून नसल्याचे स्पष्ट केले असून संशयास्पद मृत्यू म्हणून तपासाला वेग दिला आहे.

संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह
भुसावळातील आराधना कॉलनीजवळच्या रेल्वे रुळाखाली शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह पडल्याची माहिती शहर पोलिसांना मिळताच शहरचे पोलिस स्टेशनचे गजानन पडघन, सहायक पोलिस निरीक्षक संदीप दुनगहू व सहकार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी केली. अनोळखी मृतदेहाची ओळख पटलेली नसल्याने तपासात अडचणी निर्माण झाली आहे. या घटनेप्रकरणी भुसावळ शहर पोलिस स्टेशनला सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.



गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह आरोपी धुळे गुन्हे शाखेच्या जाळ्यात 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !