अंगणात झोपलेल्या तरुणाच्या खाटेवरून मोबाईल लांबवले
जळगाव : शहरातील खोटेनगरातील हिरा गौरी पार्क येथे अंगणात झोपलेल्या तरुणासह त्याच्या वडिलांचा उशाशी ठेवलेले नऊ हजारांचे दोन मोबाईल चोरट्यांनी लांबवले. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
मोबाईल चोरी प्रकरणी गुन्हा
हिरा गौरी पार्क येथे किरण प्रेमलाल चौधरी (34) हे वास्तव्यास आहेत. उकाड्याचा त्रास होत असल्याने किरण चौधरी हे अंगणात खाट टाकून झोपले होते. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या उशाशी ठेवलेले मोबाईल लांबवले व ही बाब सकाळी उघडकीस आली. किरण चौधरी यांनी तालुका पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक उमेश ठाकूर हे करीत आहेत.

भुसावळात 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू







