!-- afp header code starts here -->

Bacchu Kadu भुसावळातील विविध समस्यांबाबत राज्यमंत्री बच्चू कडू यांना साकडे

भुसावळ शहरातील हॉकर्स झोनचा तिढा सोडवण्यासह तहसीलमधील रेशनकार्डचा प्रश्न सोडवण्याची अपेक्षा


Bacchu Kadu Nivedan भुसावळ : भुसावळ दौर्‍यावर आलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना शहरातील विविध संस्था, संघटनांतर्फे निवेदन देवून समस्या सोडवण्याची मागणी करण्यात आली. भुसावळातील हॉकर्स झोनचा तिढा सोडवा तसेच भुसावळ तहसीलमधील रेशनकार्डचा गोरखधंदा थांबवावा व ऑनलाईन परीक्षांचा तिढा सोडवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

भुसावळातील हॉकर्स झोनचा तिढा सोडवा
राष्ट्रीय मजदूर सेना प्रणित राष्ट्रीय हॉकर्स सेनेतर्फे भुसावळातील हॉकर्स झोनचा तिढा सोडवण्याची मागणी करण्यात आली. शहरातील मरीमाता नाल्यावर स्लॅब टाकून हॉकर्स व हातगाडीधारकांना व्यवसायासाठी व्यापारी संकुल उभारावे, हॉकर्स हातगाडी धारकांसाठी घरकूल मंजूर करावे, राज्य शासनाच्या योजनेतून हॉकर्स, हातगाडीधारक, फळ विक्रेते, भाजीपाला विक्रेते यांना सरकारी योजनेमार्फत प्रत्येकी दहा लाखांचे विमा कवच मिळावे, शासनाच्या कल्याणकारी योजनेतून पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज प्रकरणे मंजूर करावीत, हॉकर्स, हातगाडीधारक, फेरीवाले यांच्यासाठी आराम कक्ष बांधून मिळण्याची मागणी करण्यात आली. निवेदनावर राष्ट्रीय हॉकर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सपकाळे यांची स्वाक्षरी आहे.

भुसावळ तहसीलमधील रेशनकार्डचा गोरखधंदा थांबवावा
भुसावळ तहसील कार्यालयात सर्वसामान्यांना रेशनकार्ड मिळणे दुरापास्त झाले असून काही राजकीय पुढारी व विशिष्ट पक्षाच्या लोकांना हे रेशनकार्ड मिळत असल्याचा प्रकार सुरू असून गैरप्रकारांना चाप बसवावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली आहे. भुसावळ शहरात महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने या संदर्भातही दखल घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ऑनलाईन परीक्षांचा तिढा सोडवा
प्रहार विद्यार्थी संघटनेचे भुसावळ तालुकाध्यक्ष सुमित जगन्नाथ बनसोडे यांनी राज्यमंत्र्यांना विविध शैक्षणिक मागण्यांबाबत निवेदन दिले. त्यात इयत्ता नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेतून विनामूल्य पुस्तके देण्यात यावी, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थी आंदोलन करीत आहेत मात्र कुलगुरूंनी घेतलेल्या स्वतंत्र निर्णयामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून या संदर्भात स्वतंत्र बैठक घेवून ऑनलाईन परीक्षा पार पडण्यासाठी आग्रह धरावा, इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश व प्रवेश निशुल्क देण्यात यावेत व त्यासाठी उत्पन्नाची मर्यादा एक लाखांच्या आत असावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

तीन गावठी कट्टे व 14 जिवंत काडतुसासह दरोडेखोर जाळ्यात : दरोड्याचा डाव उधळला


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !