!-- afp header code starts here -->

भरधाव चारचाकीने दुचाकीला उडवल्याने जळगावातील महिला गंभीर


जळगाव : अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने खंडेराव नगरातील महिला जखमी झाली. हा अपघात सोमवार, 23 रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला.

अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा
दीक्षा किशोर बुवा (20, खंडेराव नगर, गणपती मंदीराजवळ, जळगाव) या आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास असून सोमवार, 23 मे रोजी सकाळी 7.30 वाजता त्या दुचाकीने शिव कॉलनी स्टॉप समोरून जात असताना त्यांच्या दुचाकीला मागून चारचाकी (एम.एच.19 डी.एस .1194) या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत दीक्षा बुवा ह्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारानंतर शनिवार, 28 मे रोजी रात्री 11 वाजता चारचाकी वाहनधारकावर (नाव गाव माहित नाही) याच्या विरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रशांत पाठक करीत आहे.

 


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !