!-- afp header code starts here -->

ही बातमी महत्त्वाची : आधारकार्डचा वापर करताना ही नियमावली लक्षात असू द्या


जळगाव : केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने नागरीकांना आधार कार्ड वापराबद्दल याबद्दलचं एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठीच्या सूचना यामधून देण्यात आल्या आहेत. आधार कार्डच्या फोटोकॉपीऐवजी मास्क आधार कार्डचा वापर करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मास्क आधार देण्याचे आवाहन
नागरीकांनी आधार कार्डची छायाप्रत कोणत्याही संस्थेला किंवा कुठेही देऊ नये, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. त्याऐवजी तुम्ही मास्क आधार द्यावा. यामुळे तुमच्या आधारचा गैरवापर होणार नाही. अनेकजण हॉटेल चेक इन किंवा अन्य कारणांसाठी आधार कार्डचा वापर करतात. मात्र हॉटेल्स, चित्रपटगृह यासारख्या खासगी संस्थांना आधार कार्डची प्रत घेण्याची आणि त्यांच्याकडे ठेवण्याची परवानगी नाही. यामुळे आधार कार्ड कायदा 2016 चे उल्लंघण होते.

यूआयडीएआयनं दिलेला परवाना आहे का?
यूआयडीएआयकडून परवाना मिळालेल्या संस्थाच एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आधार कार्डचा वापर करू शकतात. यूआयडीएआयचा परवाना नसलेल्या संस्थांना आधार कार्ड मागण्याची परवानगी नाही. एखाद्या खासगी संस्थेनं तुमच्याकडे आधार कार्डची फोटोकॉपी मागितल्यास त्या संस्थेकडे यूआयडीएआयनं दिलेला परवाना आहे का, याची खातरजमा करून घ्या.

मालवाहतूक करणार्‍या एनएमजी वॅगनची नांदगावजवळ रूळावरून बोगी घसरली : अप मार्गावर रेल्वे गाड्या दोन तास विलंबाने धावल्या


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !