खुनाने नाशिक हादरले : प्रेमसंबंधातील वादातून तरुणाला संपले
नाशिक : नाशिकमध्ये गुन्हेगारीने डोके वर काढले असून प्रेमसंबंधातील वादातून तरुणाचा खून करण्यात आला असून तिघांना या प्रकरणी अटक करण्यात आली. सागर प्रकाश रावतर (वय 20) असे मृत युवकाचे नाव असून गौतम भोये, गणेश भोये, भरत भोये या आरोपींना अटक करण्यात आली. आठवड्याभरातील हा सहावा खुन आहे.
एज्युकेशन फॉर यु कंपनीच्या माध्यमातून नागरीकांना कोट्यवधींचा गंडा ‘राजकुमार’ एलसीबीच्या जाळ्यात
वादात उडी घेतल्याने खून
मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम संबंधावरून झालेल्या वादात उडी घेतल्यामुळे वडाळा रोडवरील शिवाजी वाडी येथे खून झाला.. झोपडपट्टी परीसरात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या हाणामारीत तरुणाला घाव वर्मी लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्याचा मृत्यू झाला.

गुन्हेगारी वाढली
नाशि शहरात या आठवड्यामध्ये खुनाचे सत्र सुरू आहे. म्हसरुळ, गंगापूररोड, द्वारका, माडसांगवी या भागात खुन झाले आहेत. या सर्व पोलिसांचा एकमेकांशी संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. किरकोळ किंवा विविध कारणांमुळे हत्या होत असल्या तरी शहरात गुन्हेगारी वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.
विश्रामजीन्सी भागात शेत नांगरतांना ट्रॅक्टर उलटले : अल्पवयीन चालकाचा मृत्यू







