Punjabi Singer Sidhu Moose Wala Shot Dead पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या
Punjabi Singer Sidhu Moose Wala Shot Dead in Mansa Day After security cut ; 2 others also injured चंडीगड : 424 व्हीआयपींची सुरक्षा काढल्याच्या एक दिवसानंतर प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गँगस्टरने गोळ्या झाडून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मुसेवाला यांच्यावर मनसा येथील जवाहरके गावाजवळ गोळीबार झाला मात्र उपचारार्थ हलवत असतानाच त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात मुसेवालासोबत असलेले दोन अन्य लोकही जखमी झाले.
खुनाने नाशिक हादरले : प्रेमसंबंधातील वादातून तरुणाला संपले
सुरक्षा हटवताच झाला हल्ला
मुसेवाला याला गँगस्टर्सकडून धमक्या मिळत असताना पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देऊन एक दिवसापूर्वीच मुसेवालासह 424 व्हीआयपींची सुरक्षा मागे घेतली व त्यानंतर हल्लेखोरांनी संधी शोधली. मुसेवाला याने पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार विजय सिंगला यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.

चाहत्यांमध्ये पसरली शोककळा
17 जून 1993 रोजी जन्मलेला शुभदीप सिंह सिद्धू उर्फ सिद्धू मुसेवाला मनसा जिल्ह्यातील मुसा गावातील रहिवासी होता. मुसेवालाची फॅन फॉलोइंग लाखोंच्या संख्येमध्ये आहे. तसेच तो त्याच्या गँगस्टर रॅपसाठी प्रसिद्ध होता. सिद्धू मुसेवालाची आई गावची सरपंच होती. सिद्धूने इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये डिग्री मिळवली होती. त्याने आपल्या कॉलेजच्या दिवसांमध्ये संगिताचे शिक्षण घेतले. त्यानंतर तो कॅनडाला गेला होता. मुसेवाला वादग्रस्त पंजाबी गायकांपैकी एक होता. तो खुलेआम बंदुक संस्कृतीला प्रोत्साहन द्यायचा तसेच उत्तेजक गीतांमध्ये गँगस्टर्सचं उदात्तीकरण करायचा.
दिलगिरी व्यक्त केली असेल तर चला विषय संपवू या : सुप्रिया सुळे







