भुसावळात स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर जयंती उत्साहात
भुसावळ : स्वातंत्र्यवीर सावरकर मध्यवर्ती राष्ट्रीय प्रबोधन संस्था, भुसावळच्या वतीने स्वा.सावरकरांची 139 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी लघुउद्योजक मेळावा झाला.
यांची होती उपस्थिती
शहरातील लघू उद्योजकांचे एक सूत्रबद्ध संघटन करून लघू उद्योजकांना सर्वोतपरी सहकार्य करण्यासाठी संस्था उद्योजक व ग्राहक यांच्यात मध्यस्थाची भूमिका बजावून उद्योग वाढीसाठी सहकार्य करण्याचे ठरले तसेच व्यवसाय मार्गदर्शन शिबिर, व्यवसाया संदर्भात खरेदी,-विक्री चे प्रदर्शन या सारखे कार्यक्रम आयोजित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. जे.एन.पुराणिक, रमेश पालखे या जेष्ठांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुराणिक व संस्था सचिव गणेश वढवेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास परशुराम सेवा समिती चे उमाकांत शर्मा (नमा), भूषण वैद्य, जयप्रकाश शुक्ला, दीपक पाथरकर, गौरव हिंगवे, रमाकांत भालेराव, रमाकांत केर्हाळकर, लोकेश जोशी, सागर पत्की, देवेश कुलकर्णी, संकेत कुलकर्णी, प्रशांत उपासनी, पूजन महाजन, सावरकर मंडळाचे शंभू गोडबोले, निरज तिवारी, संजय बोचरे, यश इंगळे, विनोद भालेराव, श्रीकांत वढवेकर, रागिणी पुराणिक, अंजली कवठाळकर, प्रज्ञा संत लक्ष्मी वढवेकर व असंख्य सावरकर प्रेमी उपस्थित होते.








