!-- afp header code starts here -->

धक्कादायक : माय-लेकींची गीतांजली एक्स्प्रेसखाली आत्महत्या


देवळाली कॅम्प : डाऊन गीतांजली एक्स्प्रेससमोर झोकून देत माय-लेकींनी आत्महत्या केली. ही घटना रविवार, 29 रोजी पाळदे मळ्याजवळील रेल्वे ट्रॅकजवळ घडली. अनिता बाळासाहेब शिरोळे (43) व त्यांची कन्या राखी शिरोळे (23) अशी मयतांची नावे आहेत. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
मल्हारीबाबा मंदिराजवळ अनिता बाळासाहेब शिरोळे (43) या त्यांची कन्या राखी शिरोळे (23) पती बाळासाहेब यांच्यासमवेत राहत होत्या. पती बाळासाहेब शिरोळे हे रेल्वे प्रशासनाचे ठेकेदार असून, ते रविवारी सोलापुरात कामानिमित्त गेलेले होते. घरात मायलेकी दोघीच होत्या. या दोघींनी अचानकपणे सकाळी साडेनऊच्या सुमारास मायलेकींनी स्कूटी गाडीने रेल्वे ट्रॅक गाठला. डाऊन लाईनवरून नाशिककडे भरधाव येणार्‍या गीतांजली एक्सप्रेसपुढे दोघींनी आत्महत्या केल्याचे देवळाली कॅम्प पोलिसांनी सांगितले. पोल क्रमांक 176/5 जवळ दोघींचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पोलिसांना आढळून आले. एकाच वेळी आई व मुलीने आत्महत्या केल्याने परिसरातील नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत. राखी महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. त्यांची थोरली मुलगी विवाहित आहे. मायलेकीने नेमके असे टोकाचे पाऊल का उचलले, याचा उलगडा रात्री उशिरापर्यंत होऊ शकलेला नव्हता. या प्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक पवार या करीत आहेत.

टाकळी शिवारात बंद घर पर्वणी : दोन लाखांचा मुद्देमाल चोरीला 


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !