UPSC Result 2021 युपीएससी परीक्षेत मुलींची बाजी : देशातून श्रृती शर्मा पहिली
UPSC Result 2021 नवी दिल्ली : यूपीएससी 2021 फायनल निकालात (UPSC Result 2021) मुलींनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रृती शर्मा (Shruti Sharma UPSC Topper) देशात पहिली आली आहे तर अंकिता अग्रवाल आणि गामिनी सिंगला यांनी अनुक्रमे दुसरा व तिसर्या क्रमांक पटकावला आहे. देशात यंदा यूपीएससीमध्ये एकूण 749 उमेदवार यशस्वी ठरले आहेत.
UPSC declares 2021 Civil Services Exam results
Shruti Sharma, Ankita Agarwal and Gamini Singla secure top three ranks, respectively pic.twitter.com/b0x9N0IomU
— ANI (@ANI) May 30, 2022

महाराष्ट्रातून प्रियवंदा पहिली
महाराष्ट्रातून प्रियंवदा अशोक म्हाडदळकर ही पहिली आली आहे. तिची ऑल इंडिया रँक 13 आहे. टॉप-15 मध्ये देसणारं हे एकमेव मराठी नाव आहे. यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावरहा निकाल जाहीर करण्यात आला. उमेदवारांचे वैयक्तिक गुण निकालानंतर 15 दिवसांनी जाहीर करण्यात येणार आहेत. आयोगाने 17 मार्च रोजी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2021 आयोजित केली होती. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती 5 एप्रिल ते 26 मे 2022 या कालावधीत घेण्यात आल्या. या परीक्षेच्या माध्यमातून नागरी सेवेतील 712 पदे भरली जाणार आहेत.







