!-- afp header code starts here -->

चोरीच्या पाच दुचाकींसह ‘सलमान खान’ला धुळ्यात अटक


धुळे : धुळे शहर पोलिसांनी अट्टल दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्या ताब्यातून चोरीच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. सलमान खान गफ्फार खान पठाण (31, रा.चांदतारा चौक, मौलवीगंज, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांना संशयीताबाबत माहिती मिळाली होती. संशयीत सलमान खान साक्रीरोड परीसरात चोरीच्या हिरो होंडा पॅशन प्रोवर फिरताना आढळताच त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने पाच दुचाकी चोरीची कबुली दिली. आरोपीच्या घराच्या मागील बाजुस असलेल्या पत्र्याच्या शेडमधून बजाज डिस्कव्हर 125, हिरो पॅशन प्रो, होंडा शाईन, बजाज चॅम्पियन हिरो होंडा, एच.एफ डिलक्स अशा पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. दोन दुचाकी चोरीबाबत आझाद नगर पोलिसात गुन्हा दाखल आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण पाटील, अपर पोलिस अधीक्षक डॉ.प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख, शोध पथकाचे अधिकारी एपीआय दादासाहेब पाटील, दत्तात्रय उजे, एएसआय भिकाजी पाटील, दिनेश परदेशी, संदीप पाटील, प्रल्हाद वाघ, कुंदन पटाईत, प्रसाद वाघ, निलेश पोतदार, गुणवंत पाटील, अविनाश कराड, प्रवीण पाटील, मनीष सोनगीरे, चालक सचिन पगारे आदींच्या पथकाने केली.

शिरपूर तालुक्यात महिलेचा खून करून मृतदेह जाळला


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !