अल्पवयीन बालिकेसोबत अश्लील चाळे : चाळीसगावातील घटना
चाळीसगाव : सहा वर्षीय चिमुकलीसोबत अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील एका भागात घडला असून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिरपूर तालुक्यात महिलेचा खून करून मृतदेह जाळला
अश्लील चाळे करीत विनयभंग
चाळीसगाव शहरातील एका भागात सहा वर्षीय बालिका ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. सोमवार, 30 मे रोजी सायंकाळी सात वाजेच्या चिमुकली ही आपल्या घराच्या समोरील खेळत होती. त्यांच्या घराच्या शेजारी राहणारा संशयित आरोपी काल्या ऊर्फ फारुक शेख फकीरा शेख याने बालिकेला बोलावून तिच्याशी अश्लील चाळे करीत तिचा विनयभंग केला. हा प्रकार पिडीत बालिकेच्या नातेवाईकांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी काल्या उर्फ शेठ फकीरा शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक बिरारी करीत आहे.

अहिरवाडी परीसरात वादळी वार्याने केळीला मोठा फटका







