निंबाच्या झाडाला गळफास घेवून तरुणाची आत्महत्या
अमळनेर : तालुक्यातील फाफोरे बुद्रुक येथील 24 वर्षीय तरुणाने शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
जामनेर तालुक्यात दुचाकींच्या भीषण अपघातात तिघे ठार
अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
अविनाश रमेश पवार (24, फाफोरे बुद्रुक, ता.अमळनेर) हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार, 1 जून रोजी दुपारी त्याच्या शेतात निंबाचा झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. सचिन मोहन जाधव यांच्या खबरीवरून अमळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस नाईक कैलास शिंदे करीत आहे.

लाखाची लाच भोवली : मेहुणबारे पोलिस ठाण्याचा लाचखोर फौजदार जळगाव एसीबीच्या जाळ्यात







