दुकान चालवायचे झाल्यास पैसे द्यावे लागतील म्हणत विक्रेत्याला चाकूने भोसकले
जळगाव : दुकान चालवायचे असेल तर पैसे द्यावे लागतील, असे म्हणत एमआयडीसीत चहा नाश्ताची गाडी लावणार्या विक्रेत्याला दोन जणांनी चाकूने भोसकून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
मुक्ताईनगरात बनावट बियाण्यांची विक्री : दोघांना अटक
चाकूने केला हल्ला
अयोध्या नगरातील रहिवासी शिवनाथ आसाराम शिंदे (35) हा एमआयडीसीतील व्हि- सेक्टर येथे हेरम्स कंपनीजवळ नाश्ता तसेच चहा विक्री गाडी लावतो. त्यावर उदरनिर्वाह भागवतो. बुधवार 1 जून रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास राहुल रामचंद्र बराटे व गणेश अर्जुन कोळी हे दोघेही शिवनाथ शिंदे याच्या लोड गाडीजवळ आले. दुकान चालवायचे असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील असे म्हणत त्यांनी शिवनाथ शिंदे यांच्याकडे पैशांची मागणी केली. शिंदे याने पैसे देण्यास नकार दिला असता त्याचा राग आल्याने गणेश कोळी याने शिवनाथ यास पकडून ठेवले तर राहुल रामचंद्र बर्हाटे याने शिंदे यांच्यावर चाकूने वार करत त्याला जखमी केले. त्यानंतर शिवनाथ शिंदे यांची गाडी पलटी करून नुकसानही केले. याप्रकरणी जखमी शिवनाथ शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहुल रामचंद्र बर्हाटे व गणेश अर्जुन कोळी (दोन्ही रा.जळगाव) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार विजय पाटील हे करीत आहेत

कर्जोदच्या विवाहितेसह तिघांवर हल्ला







