!-- afp header code starts here -->

24 वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या


शिरपूर : तालुक्यातील जैतपुर शिवारात लिंबाच्या झाडावर 24 वर्षीय युवकाचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. याप्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. बापू भिका भिल (24, जैतपूर, ता.शिरपूर) असे नाव गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे.

तरुणाची गळफास घेत आत्महत्या
शिरपूर तालुक्यातील जैतपुर शिवारात सकाळी 11 वाजेच्या सुमारास जैतपुर येथील युवराज राजपूत यांच्या शेतातील बांधावर लिंबाच्या झाडावर दोराच्या साहाय्याने बापू भिका भिल याचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच थाळनेर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व सदर मृतदेह खाली उतरवून शिरपुर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले. या प्रकरणी वार्डबॉय प्रवीण पाटील यांनी थाळनेर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने थाळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास नाईक ललित खळगे करीत आहे.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !