इगतपुरीत तरुणाची हत्या : चाळीसगावात दाम्पत्याला अटक
चाळीसगाव : इगतपुरी येथील रेल्वे तलावावर 22 मे रोजी आंघोळीसाठी आलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली होती. या हत्येतील संशयीत आरोपी चाळीसगावात लपून असल्याची माहिती चाळीसगाव शहर पोलिसांना मिळाल्यानंतर आरोपीसह त्याच्या पत्नीस ताब्यात घेण्यात आले.
24 वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या
गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगाव शहरातील बामोशी बाबा दर्गा परीसरातील झोपडीतून एका महिलेसह दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना इगतपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जुबेर मुन्वर पिंजारी (25) व त्याची पत्नी बसंती जुबेर पिंजारी (24, दोन्ही रा.धुळे) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघे पती पत्नी धावत्या रेल्वेत गाणी म्हणून मिळालेल्या पैशावर आपला उदरनिर्वाह करत असल्याचे समोर आले आहे. इगतपुरी येथील तरूण आपला मुलगा आणी भाचा यांच्यासह अंघोळीसाठी रेल्वे तलावावर गेला होता. त्यावेळी तेथे दोन तरुणी व दोन ते तीन तरुण दारु पित बसले होते. त्यातील दोघांनी तरुणाच्या मानेवर चाकूचे वार केले होते. त्यात तरुणाचा मृत्यू झाला.

नटवाडेतील विवाहितेचा अनैतिक संबंधातून पतीनेच केला खून







