!-- afp header code starts here -->

धरणगाव तालुक्यातील वृद्धाचा सर्पदंशाने मृत्यू


धरणगाव : तालुक्यातील भोद बुद्रुक येथील 65 वर्षीय वृध्द व्यक्तीचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

शेतात काम करताना सर्पदंश
अशोक पुंडलिक पाटील (रा. भोद बुद्रुक, ता.धरणगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. 28 मे रोजी शेतात काम करत असतांना त्यांना उजव्या पायाला सापाने चावा घेतला. त्यांना तातडीने धरणगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. अशोक पाटील यांचा प्रकृती खालावल्याने त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास खुशाल पाटील करीत आहे.

 


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !