अवैध वाळू करणारे डंपर शहर पोलिसांनी पकडले
जळगाव : शहरातील शिवाजी नगरातील स्मशानभूमी परीसरातून वाळूची चोरटी वाहतूक करणारे डंपर शहर पोलिसांनी पकडले आहे. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर
शहर पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी हे गुरूवार, 2 जून रोजी मध्यरात्री 3.30 वाजेच्या सुमारास शिवाजी नगरातील स्मशानभूमीजवळील रोडवर गस्तीवर होते. त्यावेळी डंपर क्रमांक (एम.एच. 19 झेड. 3917) मधून बेकायदेशीररीत्या वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याचे दिसून आले. त्यावेळी पोलिसांनी डंपर थांबवून वाळू वाहतूकीचा परवाना विचारला असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यानुसार वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर डंपर जप्त करण्यात आले.

शहर पोलिसात गुन्हा दाखल
या प्रकरणी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पोलिस कॉन्स्टेबल कमलेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पांडूरंग आनंदा सोनवणे (22, खेडी, ता.जळगाव) आणि छोटू एकनाथ सपकाळे (आसोदा रोड, मोहन टॉकीजजवळ) यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहे.







