!-- afp header code starts here -->

वीज चोरटे महावितरणच्या रडारवर : खेडगावात वीज मीटरमध्ये फेरफार करणार्‍यांना पाच लाखांचा दंड


चाळीसगाव :  मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करणार्‍या तालुक्यातील खेडगाव येथील एकूण 18 वीज ग्राहकांवर महावितरणने पाच लाखांचा दंड सुनावल्याने वीज चोरट्या ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. विजेची चोरी करणार्‍यांनी दंड मुदतीच्या आत न भरल्यास त्यांच्यावर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांनी कळविले आहे.

नास्त्याची गाडी लावणार्‍यावर चाकूहल्ला : दोघे संशयीत जाळ्यात 

गुरुवारी धडक तपासणी मोहिम
तालुक्यातील खेडगाव येथे महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मीटर तपासणीची मोहीम गुरुवार, 2 रोजी राबविण्यात आली. यावेळी गावातील एकूण 18 वीजग्राहकांनी मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला. त्यावर महावितरण कंपनीकडून त्यांना पाच लाख 5 हजार पाचशे चोपन्न रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

या ग्राहकांविरोधात झाली कारवाई
एकूण 39 हजार 12 युनिटची चोरी अठरा वीज ग्राहकांनी केली आहे. यात मनीषा भिकन साळुंखे, भाऊराव लाला साळुंखे, अरुण शंकर साळुंखे, नारायण बळीराम साळुंखे, मनुबाई काशीराम महाजन, लक्ष्मण गोपाळ वाणी, संभाजी परसराम साळुंखे, मेहमूदीबी मणियार, शांताबाई शंकर माली, केशवराम चंदरसिंग, युनूस मुसा खाटीक, अमीर वाझी मणियार, गंभीर अब्दुल पिंजारी, वामन धोंडू पाटील, वसंत कळू पाटील, पुंडलिक झंवर महाजन, नबाबाई काळू चौधरी, राजेंद्र अर्जुन माली आदींचा समावेश आहे. दरम्यान दिलेल्या मुदतीत वरील वीजग्राकांनी दंड भरला नाही तर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.

वीज चोरी केल्यास खबरदार
कुणीही आकोडा टाकून किंवा मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करू नये, असे आवाहन मुख्य कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांनी केले आहे. ही कारवाई मुख्य कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता ब्राह्मणकर (मेहुणबारे उपविभाग), सहा.अभियंता नागदेव (जामदा कक्ष), सहा.अभियंता कदम (तरवाडे कक्ष), सहा.अभियंता खंदारे (खेडेगाव कक्ष) व लाईन मेन यांच्या पथकाने केली.

भीमकुळाचे सच्चे वारसदार प्रतापसिंग बोदडे यांचे हृदयविकाराने निधन


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !