ब्लॅकमेल करून तरुण विवाहितेवर बलात्कार ; आरोपीला अटक
पुणे : औरंगाबाद येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या तरुणाने नवविवाहित 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीचे अश्लील फोटो तिच्या पतीस पाठवून तिची बदनामी करण्यात आली. याप्रकरणी पीडित तरुणीने हिंजवडी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपीस अटक करण्यात आली. अविनाश पांडुरंग करगळ (26, रा.चांदोर, ता. भूम, जि. उस्मानाबाद) असे आरोपीचे नाव आहे.
हॉटेलमध्ये नेत केला अत्याचार
आरोपी अविनाश करगळ व तरुणी औरंगाबाद येथे एमसीएचे शिक्षण घेत असताना त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर एमसीएच्या तीन महिन्यांच्या इंटरर्नशिपसाठी महाविद्यालयाचे काही विद्यार्थी हिंजवडीत एका कंपनीत गेले होते. यात दोघांचाही सहभाग होता. काही दिवसांपूर्वी आरोपीने तरुणीला वाकडच्या एका हॉटेलमध्ये नेले. त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. दोघांचे अश्लील फोटो मोबाईलमध्ये काढले.








