!-- afp header code starts here -->

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी


जळगाव : चारचाकी आणि दुचाकीत झालेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. हा अपघात तालुक्यातील नशिराबाद गावानजीक महामार्गावर घडला.

भरधाव चारचाकीने दुचाकीला उडवले
नशिराबाद येथे मोहिब्बुल हक मन्यार (39) हा वास्तव्यास आहे. तो मजुरी काम करुन उदरनिर्वाह भागवतो. मोहिब्बुल हा 1 जून रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्याच्या दुचाकी (एम.एच. 19 डी.एक्स. 6286) ने महामार्गाने जात असतांना महेंद्रा शोरुमजवळ त्याच्या दुचाकीला चारचाकीने जोरदार धडक दिली. अपघातानंतर चारचाकीचालक घटनास्थळावरुन पळून गेला होता. या अपघातात मोहिब्बुल हा जखमी होवून त्याच्या दुचाकीचे नुकसान झालेण

नशिराबाद पोलिसात गुन्हा
याप्रकरणी मोहिब्बुल याने शुक्रवार, 3 जून रोजी चारचाकी चालकाविरोधात नशिराबाद पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन चारचाकीवरील अनोळखी चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र ठाकरे हे करीत आहेत.

 


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !